दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज जन्मदिवस. आज तो या जगात नसला तरीही चाहत्यांच्या मनात त्याने एक खास जागा निर्माण केली आहे. आज त्याच्या जन्मदिनानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ती हिने सुशांतचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावरून शेअर केले. त्याचप्रमाणे तिचे काही व्हिडीओ शेअर करत तिने सुशांतच्या बालपणीच्या आठवणीही सांगितल्या.

श्वेताने सुशांतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जिथे कुठे असतील तिथे खुश राहा. मला तर वाटतं की तू भगवान शंकराबरोबर आता कैलासात फेरफटका मारत असशील. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कधीतरी तू आहेस तिथून खालीही बघ. तुला दिसेल की तू काय जादू केली आहेस आणि तुझ्यासारख्या सोनेरी मनाच्या अनेक सुशांतना जन्म दिला आहेस. मला तुझा अभिमान वाटतो आणि तो कायमच वाटत राहील.”

आणखी वाचा : “त्याला केवळ २ तास…” कियारा अडवाणीने केलेला सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल खुलासा

तर श्वेताने तिचा एक व्हिडीओ शेअर करत सुशांतच्या काही बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तिने व्हिडीओच्या मार्फत त्यांच्या घरी असलेले सुशांतचे काही जुने फोटो चाहत्यांना दाखवले.

आणखी वाचा : ५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांतसिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलेले फक्त २१ रुपये, वाचा संपूर्ण किस्सा

तसंच आणखी एका व्हिडीओतून तिने त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “उन्हाळ्याचे दिवस होते. मी आणि सुशांत तेव्हा पाचवी किंवा सहावीत होतो. एक दिवस घरातील सगळी मंडळी दुपारी झोपली असताना आम्ही गच्चीत गेलो आणि काहीतरी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. ऊन्हामुळे गच्ची आधीच तापलेली होती त्यावर आम्ही विटा रचून एक पातेलं ठेवून खाली केरोसीन ओतून पातेल्यातला तो पदार्थ शिजवण्याचा प्रयत्न केला. पण ती आग गच्चीत गच्चीत पसरू लागली. आम्ही दोघ घाबरलो आणि खाली पळालो. पण नंतर आमच्या लक्षात आलं की ती आग जरा आम्ही तशीच ठेवली तर ती सगळीकडे पसरेल. मग आम्ही पुन्हा वरती गेलो आणि पाणी ओतून ती आज विझवली.”

हेही वाचा : Photos: कैद्यांबरोबर नाचली आणि…; जाणून घ्या तुरुंगात महिनाभर कशी वागली रिया चक्रवर्ती

तिच्या या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत सुशांतचे चाहते त्याच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करत आहेत. तसंच त्याची कमतरता भासत आहे, सुशांतची आठवण येत आहे असंही अनेक जण म्हणताना दिसत आहेत.

Story img Loader