अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते. दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. श्वेता सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी श्वेता तिवारीला ट्रोल केलं आहे.

श्वेताने तिचा पूर्वीपासून मित्र असलेल्या अभिनेता विकास कलंत्रीला एक खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताने विकाससोबते काही जुने फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलंय. श्वेताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “तुझ्याबद्दल काय लिहू? मी फक्त एवढचं म्हणू शकते की जेव्हा मला बोलावसं वाटतं तू ऐकतोस….जेव्हा मला वाट चुकल्यासारखं वाटतं तू मार्गदर्शन करतोस…जेव्हा मी संभ्रमात असते तू माझा आत्मविश्वास वाढवतोस…जेव्हा मला पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवायला शिकायचं होतं तू सिद्ध केलंस की मी ते करू शकते. आणि म्हणूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या सर्वाच गोड मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा” असं श्वेताने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा: अफ्रिकेतील सर्वात उंच शिखर गाठत सोनू सूदला चाहत्याचं खास सरप्राइज, म्हणाला “देशाचा खरा हिरो”

मित्रासाठी लिहिलेल्या या पोस्टमुळे मात्र श्वेताला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तिसरा बकरा” तर दुसरा म्हणाला, “याचं पण आयुष्य खराब करशील तू …आणखी एक घटस्फोट” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “आता हा नवा बकरा” असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी श्वेताला ट्रोल केलंय.

shweta-troll

१९९८ सालामध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. त्यांना पलक ही मुलगी आहे. तर २००७मध्ये श्वेता आणि राजा विभक्त झाले. राजा चौधरीवर श्वेता तिवारीने हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर श्वेताने २०१३ सालामध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे. तर अभिनवदेखील हिंसाचार करत असून छळ करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. त्यानंतर २०१९ सालामध्ये श्वेताने अभिनवला घटस्फोट दिला.

Story img Loader