अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच ‘रोजी: द केसर चॅप्टर’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. पलकनं तिची आई श्वेताला वैवाहिक आयुष्यात अनेक कठीण समस्यांचा सामना करताना पाहिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकनं यावर भाष्य केलं आहे. आपल्या आईच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तिनं मोठा खुलासा केला आहे.

श्वेता तिवारीनं १९९९ मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. त्यानंतर एका वर्षानं पलकचा जन्म झाला होता. २००७ साली हे दोघंही विभक्त झाले. त्यानंतर २०१३ साली अभिनव कोहलीसोबत श्वेता पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली. पण तिचं हे लग्न देखील फार काळ टिकलं नाही आणि २०१९ मध्ये एका वाईट वळणावर येऊन ते संपलं. अभिनव कोहलीपासून श्वेताला एक मुलगा आहे. अभिनवपासून विभक्त झाल्यानंतर श्वेता आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीच करत आहे.

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

आणखी वाचा- सलमानच्या चित्रपटासाठी शहनाझ गिलनं मानधन म्हणून मागितली मोठी रक्कम? चर्चांणा उधाण

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीनं तिच्या आईचं वैवाहिक जीवन आणि त्यातील संघर्षाबद्दल सांगितलं. आई श्वेता तिवारीनं कशाप्रकारे तिच्या आयुष्यातील समस्यांचा सामना केला. पलक म्हणाली, ‘कोणीही लग्न करण्याची घाई करणं चुकीचं आहे आणि कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करून मगच अंतिम निर्णय घ्यायला हवा. मी याचा अनुभव घेतला आहे. लग्नाचा निर्णय घाई घाईत घेणं अतिशय चुकीचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती चुकीची आहे किंवा तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय तर मग तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर होणं कधीही चांगलं.’

पलक पुढे म्हणाली, ‘आपण आपल्या जोडीदारासाठी काही गोष्टी ठरवतो कारण आपल्याला त्याचं चांगलं व्हावं असं वाटत असतं. हा एक चांगला गुण आहे. पण नंतर तेच तुमच्यावर उलटून वार करतात. हे प्रेम नसतं. कमीत कमी मला तरी अशा प्रकारचं प्रेम नको आहे. महिलांना यामधून खूप त्रास होतो. मी फक्त माझ्या आईलाच नाहीच तर जगात अनेक महिलांना अशा परिस्थितीतून जाताना पाहिलं आहे.’

आणखी वाचा- “लिव्ह इन चालणार नाही…” सरोगसीसाठी डॉक्टरांनी अभिनेत्रीकडे मागितला लग्नाचा पुरावा

याशिवाय पलकनं हे देखील सांगितलं की कशाप्रकारे तिच्या आईच्या आजूबाजूचे लोकच तिच्याबद्दल अफवा पसरवण्याचं काम करतात. ती म्हणाली, ‘आम्ही आपली बाजू लोकांना समजावून सांगण्यात वेळ घालवत नाहीत. माझ्या आईसाठी तिचं कुटुंब सुरक्षित आहे की नाही हे पाहणं ही तिची पहिली प्रायोरिटी असते. मी सुद्धा यावरच जास्त लक्ष देते.’ दरम्यान पलकच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

Story img Loader