प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पलक तिवारी ही सध्या सर्वात चर्चेत असलेली माय-लेकीची जोडी आहे. ग्लॅमर आणि लुकच्या बाबतीत अनेकदा श्वेता तिवारी आपल्या मुलीवर भारी पडताना दिसते. अनेकदा तर श्वेता आणि पलक आई आणि मुलगी कमी आणि एकमेकांच्या बहिणीच जास्त वाटतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ देखील बरेच व्हायरल होताना दिसतात. श्वेताची मुलगी पलक तिवारी नेहमीच तिच्या आईचं कौतुक करताना दिसते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आई श्वेताबद्दल केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.
बॉलिवूड पदार्पणासाठी तयार असलेल्या पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बरेचदा तिची आई श्वेता तिवारी तिची मोठी बहीण आहे असं अनेकांना वाटतं. आरजे सिद्धांत कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पलक म्हणाली, “जेव्हा मी लहान होते तेव्हा मला माझ्या आईबद्दल बोललेलं ऐकायला आवडत असे. तसं तर माझी आजी मला नेहमी शाळेतून नेण्यासाठी यायची पण जेव्हा एक दिवस माझी आई मला घेण्यासाठी आली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी खूप कूल होते की माझी आई किती हॉट आणि गुड लुकिंग आहे. सर्वजण तिच्याकडे पाहत आहेत. लोक माझ्या आईचं कौतुक करायचे आणि मलाही ते खूप आवडायचं. ती माझी आई आहे याचा मला अभिमान वाटायचा.”
आणखी वाचा- Video : बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत शहनाझ- शाहरुखमध्ये दिसलं खास बॉन्डिंग, व्हिडीओ चर्चेत
पलक पुढे म्हणाली, “मी आणि माझी आई आमचं एकमेकांशी खूप खास बॉन्डिंग आहे. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांसोबत आमच्या क्रशबद्दलही बोलतो. माझी आई माझ्या एका मित्राची क्रश होती. ही थोडी विचित्र गोष्ट आहे. मी अनेकदा माझ्या मित्रांना ओरडले आहे. त्यांनी मला थेट माझ्या आईवर क्रश असल्याचं सांगितलं नाही. मात्र ते, ‘तुझी आई किती हॉट आहे’ असं अनेकदा म्हणतात. तेव्हा मी त्यांना सांगते हे आईने ऐकलं तर ती नक्कीच तुमची धुलाई करेल.”
दरम्यान पलक तिवारीनं अलिकडेच हार्डी संधूसोबत ‘बिजली बिजली’ म्यूझिक व्हिडीओसाठी काम केलं होतं. जो खूप लोकप्रिय ठरला होता. लवकरच ती विशाल मिश्रा यांचा हॉरर थ्रिलर चित्रपट ‘Rosie The Saffron Chapter’ ज्यात तिच्यासोबत अभिनेता विवेक ऑबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच मल्लिका शेरावत आणि अरबाज खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.