Shweta Tiwari अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमुळे आणि सोशल मीडियांवरच्या फोटो आणि व्हिडीओजमुळे कायमच चर्चेत असते. राजा चौधरीशी घटस्फोट झाल्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केलं. मात्र अभिनवशीही तिचा घटस्फोट झाला. श्वेताने राजा चौधरी आणि अभिनव कोहली या दोघांच्या विरोधातही घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. आता यानंतर अभिनव कोहलीने आरोप केले होते. श्वेताने काठीने मारहाण केल्याचं त्याने म्हटलं होतं.

अभिनव कोहलीने काय सांगितलं होतं?

एका मुलाखतीत अभिनवने सांगितलं होतं, “मी कधीच श्वेतावर हात उचलला नाही. पलकने खुल्या पत्रात याचा उल्लेख केला होता, पण मी तसं कधीच वागलो नाही. मी कानाखाली वाजवल्यासाठी दोनदा तिची माफी मागितली होती. मात्र श्वेताने माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. माझ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध होण्यासाठी ती असे दावे करते आहे. मात्र या दाव्यांमध्ये किंवा आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. श्वेताच नाही तर मी कधीच महिलेवर हात उचलला नाही. उलट श्वेतानेच मला दांडक्याने मारलं होतं. मी कोणालाच मारलं नव्हतं, पण श्वेताने माझ्यावर हात उचलला होता. तिने तिच्या मुलीचा वापर करून माझ्यावर चुकीचे आरोप लावले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.”

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Sharad Pawar
“या प्रकरणाचा सूत्रधार…”, मस्साजोगच्या ग्रामस्थांसमोर शरद पवार गरजले; संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत घेतली मोठी भूमिका

श्वेता आणि अभिनव यांचं चार वर्षे डेटिंग

साधारण साडेतीन ते चार वर्षे एकमेकांमसह वेळ घालवल्यानंतर आणि एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांनी २०१३ मध्ये लग्न केलं. ‘जाने क्या बात हुई’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नानंतर या दोघांना रेयांश हा मुलगा झाला. मात्र मुलाच्या जन्मानंतरच त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. मुलाला एकटं घरी सोडून श्वेता ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या शूटिंगसाठी केपटाऊनला निघून गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. त्यानंतर श्वेताने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनव कोहलीवर काही आरोप केले होते. श्वेताची मुलगी पलकनेही समोर येत अभिनववर आरोप केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये श्वेता तिवारीने अभिनव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. यानंतर हे दोघंही विभक्त झाले.

हे पण वाचा- हिना खान, श्वेता तिवारी ते दिव्यांका त्रिपाठी; छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रींकडे किती आहे संपत्ती? IMDb च्या यादीमध्ये ‘ही’ अभिनेत्री सर्वात श्रीमंत

राजा चौधरीपासूनही विभक्त झाली आहे श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने पहिलं लग्न राजा चौधरीशी केलं होतं. त्याच्यावरही श्वेता तिवारीने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. राजा चौधरीनंतर अभिनव कोहली तिच्या आयुष्यात आला. दोघांचं नातं दहा वर्ष टिकलं. मात्र पुढे हे दोघंही वेगळे झाले. यानंतर आता हा अभिनव कोहलीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने श्वेता तिवारीने मारहाण केल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader