छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असं तिने म्हटलं आणि तेथून वादाला सुरुवात झाली. या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन वाढता वाद पाहून श्वेता तिवारीने तिचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवदेनाद्वारे तिने जाहीररित्या माफी मागत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
श्वेता तिवारी नुकतंच आपली आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. यावेळी मंचावर तिने “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असे वक्तव्य केले. त्यानंतर सर्वत्र गदारोळ सुरु झाला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर तिने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे तिने यावेळी म्हटले.
श्वेता तिवारीने दिलेले निवदेन
“माझ्या सहकाऱ्याची पूर्वीची भूमिका लक्षात घेऊन मी केलेले एक विधान चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे, असे माझ्या लक्षात आले आहे . मी देवासंर्दभात दिलेले ते विधान अभिनेता सौरभ राज जैन याच्या देवतेच्या भूमिकेसंदर्भात होते. अनेक लोक हे पात्रांची नावे ही अभिनेत्यांशी जोडतात. त्यामुळेच मी माध्यमांशी संवाद साधताना उदाहरण म्हणून हे बोलली होती.”
“मात्र काहींनी या विधानातून पूर्णपणे चुकीचा समज काढला. या विधानातून झालेला गैरसमज पाहून फार दु:ख होत आहे. माझी स्वत:ची देवावर नितांत श्रद्धा आहे आणि देवावर श्रद्धा असलेली व्यक्ती म्हणून मी जाणूनबुजून किंवा नकळत लोकांच्या भावना दुखावतील, असे काहीही करणार नाही. तसेच ते बोलणारही नाही.”
“मात्र, माझे हे विधान संदर्भाशिवाय ऐकल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मला समजले. पण कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, माझा कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे माझ्या या विधानामुळे ज्यांना मी अनवधानाने दुखावले आहे, त्यांची मी नम्रपणे माफी मागू इच्छिते,” असे तिने यात म्हटले आहे.
“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान श्वेता तिवारीने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर तसेच जाहीर पद्धतीने माफी मागितल्यानंतर हा वाद शांत होण्याची शक्यता आहे. मात्र याप्रकरणावरुन तिच्याविरुद्ध झालेल्या तक्रारीचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.