अभिनेत्री श्वेता तिवारीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला आणि तिने खूप छळ सहन केला आहे. श्वेता तिवारीने दोन लग्न केली आणि दोन्ही वेळा तिच्या आयुष्यात दुःख आणि शोषणाच आलं. त्यानंतर अभिनेत्रीने स्वतःला त्या नात्यांमधून मुक्त केलं. आज श्वेता तिवारी सिंगल मदर आहे आणि दोन्ही मुलांची काळजी घेत आहे. श्वेता तिवारी सध्या तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि पुन्हा लग्न करण्याचा तिचा कोणताही विचार नाही. श्वेता तिवारी म्हणते की, आता तिचा लग्नावरील विश्वास उडाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेता तिवारी ‘मैं हूं अपराजिता’ या टीव्ही शोमधून दोन वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. अपराजिता ही एकटी आई आहे जी तीन मुलींना एकटीच वाढवते. श्वेता तिवारी खऱ्या आयुष्यातही सिंगल मदर आहे आणि तिचे आयुष्य या पात्राशी बरेच मिळते जुळते आहे. श्वेता तिवारीने अलिकडेच इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या नवीन शोबद्दल आणि दोन्ही लग्नांच्या वाईट अनुभवांबद्दल सांगितले.
आणखी वाचा- Video : ओटीटी प्ले अवॉर्ड सोहळ्यातही कार्तिक- साराच्या केमिस्ट्रीची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

श्वेता तिवारी या मुलाखतीत म्हणाली, “खरं सांगू तर मी माझं पहिलं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. कारण माझे संस्कार हेच होते की सर्वकाही समजून घ्यायचं. पण मी माझ्या दुसऱ्या लग्नात वेळ वाया घालवला नाही. मला माहीत होतं की ते बिघडलं आहे तर ते आणखी बिघडत जाणार आहे. कितीही प्रयत्न केला वाचवायचा तरही त्याचा उपयोग होणार नाही.”

दोन वेळा वैवाहिक आयुष्य विस्कळीत झाल्यानंतर श्वेता तिवारी कशी मजबूत झाली आणि तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याबद्दल श्वेता तिवारी म्हणाली, “मी एक गोष्ट करते की मी स्वतःला कधीच अपराधी मानत नाही. माझ्याकडून कुठे चूक झाली हे मला माहीत होतं. आज मी कोणत्या चुकीचे परिणाम भोगत आहे, हे मला माहीत आहे. धोका लक्षात येऊनही मी चूक केली. त्यामुळे आता एकतर मी बसून त्या चुकांचा पश्चाताप करु शकते किंवा त्या परिस्थितीसाठी देवाला दोष देऊ शकते किंवा मला काहीतरी मार्ग काढायला हवा. मला माहीत आहे की कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. वाईट आणि चांगला काळ हे रात्र आणि दिवसासारखे असतात. जेव्हा तुमच्याकडे चांगला वेळ असेल तेव्हा तो वाया जाऊ देऊ नका. वाईट काळ तात्पुरता असतो तो जास्त काळ टिकत नाही. माझी मुलगीही चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळासाठी तयार आहे. ती पण तशीच आहे.

आणखी वाचा- “घाईघाईत लग्न…” श्वेता तिवारीच्या वैवाहिक जीवनाबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा

श्वेता तिवारी म्हणाली, “आता माझा लग्नावर विश्वास नाही आणि मी माझ्या मुलीलाही कधीही लग्न करू नको असे सांगते. अर्थात हे तिचे आयुष्य आहे आणि ते कसे जगायचे हे मी तिला सांगू शकत नाही. पण लग्नासारखे पाऊल उचलण्यापूर्वी तिने नीट विचार करावा असे मला वाटते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा अर्थ असा नाही की त्याचे रुपांतर लग्नात होईल. लग्नाला आयुष्यात खूप महत्त्व आहे. पण लग्नाशिवाय आयुष्य कसं जाईल, असं वाटण्याचं कारण नाही. पण प्रत्येक लग्न वाईट नसते.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta tiwari reaction on broken marriage and regrets mrj