श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या श्वेता एका खास कारणासाठी चर्चेत आहे. १६ जुलै रोजी ‘बिग बॉस १४’ स्पर्धक आणि गायक राहुल वैद्यने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्न केले. लग्नानंतर रिसेप्शन आणि संगीत असे दोन कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यांचा लग्नसोहळा पार पडून काही दिवस उलटले तरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे याची अद्याप चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल आणि दिशा यांच्या रिसेप्शन पार्टी मध्ये टिव्ही क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये राहुलच्या ‘खतरों के खिलाडी १२’मधील सहकलाकार यांचा देखील समावेश होता. सर्वचजण छान दिसत असले तरी एका व्यक्तीचा पेहेराव लक्ष वेधून घेणारा ठरला होता आणि तो म्हणजे श्वेता तिवारीचा. श्वेता तिवारीने या पार्टीसाठी साडी नेसली होती. श्वेताला साडी नेसायला प्रचंड आवडते. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो पाहिले असता श्वेताकडे असलेल्या साड्यांच्या कलेक्शनबाबत माहिती मिळेल.


श्वेता तिवारी आपल्या स्टाईलीश कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. राहुल आणि दिशाच्या पार्टीसाठी श्वेताने नेसलेली साडी ही खासंच होती. तिच्या या साडीबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र श्वेताने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

राहुल वैद्यच्या पार्टीमध्ये श्वेताने लवेंडर रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती फार सुंदर दिसत होती. श्वेताने नेसलेल्या साडीचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट केले होते. या फोटोमध्ये तिने त्या साडीला साजेल अशी हेयर स्टाइल आणि ज्वेलरी देखील घातलेल्याचे दिसत आहे. श्वेताने नेसलेल्या या साडीची किंमत ‘९० हजार रुपये’ आहे. तिच्या या लवेंडर रंगाच्या साडीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या रिसेप्शन मध्ये श्वेता तिवारी बरोबरच अली गोनी, राखी सावंत, जैस्मिन भासिन, अर्जुन बिजलानी आणि अनुष्का सेन यांनीसुद्धा हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta tiwaris ravishing outfit at disha parmar and rahul vaidyas recpetion aad