अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराइयां’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धांत आणि दीपिका पदुकोण यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळाली. ज्याची बरीच चर्चा देखील झाली. दीपिका पदुकोणनं तर लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटात एवढे हॉट सीन दिले आहेत. ज्याबद्दल चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. अगदी रणवीर- दीपिकापासून ते सिद्धांतलाही वेगवेगळ्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे, ‘दीपिकासोबत इंटिमेट सीन देण्याआधी रणवीरची परवानगी घेतली होती का?’ याचं उत्तर आता अभिनेत्यानं स्वतःच दिलं आहे.
‘बॉलिवूड बबल’च्या वृत्तानुसार सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला, ‘अशाप्रकारच्या नकारात्मक कमेंट करून मला राग यावा यासाठी प्रयत्न केला जातो. असं काही करायची काहीच गरज नव्हती. कारण दीपिका आणि रणवीर दोघंही त्याच्या कामाच्या बाबत खूपच सजग आणि प्रोफेशनल आहेत. मी जेव्हा हा चित्रपट साइन केला त्यावेळी रणवीर पहिली व्यक्ती होती ज्याला मी कॉल केला होता. एवढंच नाही तर चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना काही काळ रणवीर आमच्यासोबतच होता. आम्ही सर्वांनी मिळून एन्जॉय केलं, पार्टी केली.’
दरम्यान जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी दीपिकाला वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये बरेच प्रश्न करण्यात आले होते. कारण हा पहिलाच चित्रपट होता. ज्यात तिनं एवढी बोल्ड भूमिका साकारली होती. त्यामुळे तिलाही, ‘अशाप्रकारचे बोल्ड सीन करण्याआधी पती रणवीरची परवानगी घेतली होतीस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर दीपिकानं, ‘रणवीरमुळेच मी एवढ्या बोल्ड चित्रपटाची निवड करू शकले.’ असं उत्तर दिलं होतं.