बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला काही दिवसांपूर्वीच एका पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या पार्टीत पोलिसांनी धाड टाकल्यानंतर सिद्धांतला अटक झाली होती. सिद्धांत व्यतिरिक्त या पार्टीमधू ड्रग्स घेतल्याच्या आरोपाखाली आणखी ५ जणांना अटत करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पोलीस चौकशीमध्ये सिद्धांत कपूरनं स्वतःची बाजू मांडताना आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटसारखीच उत्तरं दिली आहेत. या पार्टीमध्ये ड्रग्स असल्याची माहिती आपल्याला नव्हती असं सिद्धांतनं म्हटलं आहे.

सिद्धांतला अटक झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी ड्रग्स प्रकरणी त्याची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सिद्धांत कपूरनं सांगितलं की, “मला त्या ठिकाणी कोणीतरी ड्रिंक्स आणि सिगारेट देण्यात आली होती. ज्यात ड्रग्स होतं. पण मला त्या ड्रिंक्समध्ये ड्रग्स आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.” पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सिद्धांत कपूरनं आपल्याला या पार्टीमध्ये ड्रग्स असल्याची माहिती नव्हती असं म्हणत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मेडिकल रिपोर्टमध्ये सिद्धांत आणि त्याच्या साथीदारांनी कोकीनचं सेवन केल्याची बाब समोर आली आहे.

आणखी वाचा- Brahmastra Trailer : प्रेम, रोमांच आणि न संपणारी उत्कंठा; रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत कपूरनं त्याच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळण्यात आलं होतं मात्र त्याला याची कल्पना नव्हती असा दावा केला आहे. त्यानं पोलिसांना हे देखील सांगितलं की तो एक डिजे म्हणून अनेकदा पार्ट्यांसाठी बंगळुरूमध्ये येत असतो. ज्या हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आलं त्या हॉटेलमध्ये येण्याची त्याची ही चौथी वेळ होती. दरम्यान सिद्धांतचे बंगळुरूमध्ये बरेच मित्र आहे. पोलिसांनी सिद्धांत व्यतिरिक्त अन्य ४ जणांचे मोबाईल जप्त केले आहेत. तसेच संबंधित हॉटेल मालकाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान याआधी मुंबईतील एका इंटरनॅशनल क्रुझवर झालेल्या छापेमारीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चंटला देखील अटक करण्यात आली होती. जेव्हा त्याची पोलीस चौकशी झाली त्यावेळी त्यानं देखील या पार्टीमध्ये मी फक्त सिगारेट ओढली होती आणि त्यात ड्रग्स असल्याची मला कोणतीही माहिती नव्हती असं सांगितलं होतं. या प्रकरणात आर्यन खानला क्लिन चीट मिळाली असली तर अरबाजवरील आरोप अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत.