Shraddha Kapoor Brother Siddhanth Kapoor Gets Bail Today : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) मोठ्या अडचणीत सापडला होता. काल त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पण आता सिद्धांतला जामीन मिळाला आहे. त्याच्यासह अन्य चार लोकांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. या सर्वांना बेंगळुरू पोलिसांनी एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यासोबत गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

डीसीपी डॉ भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले की, “बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूर आणि इतर चार जणांना सोमवारी १३ जून रात्री उशिरा जामीन देण्यात आला आहे. मात्र, त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.”

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

एनबीटीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की श्रद्धा कपूरचा मोठा भाऊ सिद्धांतला हलासुरू पोलिसांनी रविवारी १२ जून रात्री उशिरा एमजी रोडवरील द पार्क हॉटेलमधील एका बारमधून ताब्यात घेतले. पार्टीत सिद्धार्थ डीजे होता.”

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या वडिलांमुळे मोहम्मद रफी गाऊ लागले मराठी भक्तीगीते

पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी सांगितले की, पार्टीत असलेल्या काही लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस रात्री १२.४५ वाजता घटनास्थळी पोहोचले. ‘पार्टीत जवळपास १०० गेस्ट होते. पार्टी आणि अंमली पदार्थ कोणी आयोजित केले याचा पोलीस तपास करत असून हॉटेल मालकाला नोटीसही बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : राज ठाकरे राहत असलेल्या ‘शिवतिर्थ’ या निवासस्थाचे, फोटो पाहा

सिद्धांत आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती. सिद्धांत हा ३७ वर्षांचा आहे. सिद्धांतने ‘शूटआउट अॅट वडाला’, ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’ आणि क्राइम-थ्रिलर वेब सीरिज ‘भौकाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhanth kapoor gets bail shakti kapoor son arrested in bengaluru in drugs case dcp