हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या बहुचर्चित ‘बँग बँग’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अबू धाबी येथे सुरु आहे. मात्र, चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याचा पारा चढल्याचे चित्र चित्रपटाच्या सेटवर आहे.
सिद्धार्थ सध्या काही महत्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण आहे. पण, या चित्रीकरणादरम्यान सेटवरचे फोटो काढून ते सोशल साइटवर प्रदर्शित होत असल्याचे सिद्धार्थच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सेटवरील सर्व कामगारांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. “सिद्धार्थ तरी काय करणार? त्याच्याकडे काहीच पर्याय राहिलेला नाही. चित्रीत करण्यात येत असलेली दृश्ये प्रेक्षकांच्या मनात भरतील अशी असून याबाबत लोकांना आधीच काही कळू नये असे त्याला वाटते. मोबाइल बंदीच्या निर्णयामुळे सेटवरील काम सुरळीत चालेल असे त्याला वाटते,” असे सेटवरील सूत्रांनी म्हटले आहे.
अजून दोन आठवडे हृतिक आणि कतरिना अबू धाबीमध्ये चित्रीकरण करणार आहेत.

Story img Loader