प्रेमकथेवर आधारित असलेला ‘पिंडदान’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेचं या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. मनवा नाईक आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे आपल्याया एकत्र पाहावयास मिळणार आहेत.
अभिनेत्री मनवा नाईक या चित्रपटात रुहीच्या भुमिकेत तर सिद्धार्थ चांदेकर याने आशुतोषची भूमिका साकारली आहे. चित्रपटात या दोघांचा नवा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रशांत पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती उद्य पिक्चर्सने केली आहे. मनवा, सिद्धार्थव्यतिरिक्त यात प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, फरिदा दादी आदी कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
मनवा आणि सिद्धार्थ चांदेकरच्या ‘पिंडदान’चा पोस्टर प्रदर्शित
मनवा आणि सिद्धार्थ हे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 11-03-2016 at 15:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar and manva naiks pindadaan movie poster launch