मराठी मनोरंजनसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. अभिनयाबरोबरच सिद्धार्थ सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहून तो अनेक पोस्ट शेअर करत असतो, तसंच त्याच्या प्रत्येक पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना नेहमीचं काही ना काही माहिती मिळत असते, ही माहिती चाहत्यांच्या पसंतीस देखील पडते. मात्र सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमधून त्याने घरापासून दूर राहिल्यावर कसं वाटतं हे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत

नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तो एका शांत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने लिहिलं, “१२ वर्ष झाली मला माझ्या पुण्यातल्या घरापासून लांब जाऊन. आणि आत्ता कुठे मला माझं घर मिळालंय. अशी एक जागा जिथे आपण आपल्या तोंडावरचे सगळे चेहरे काढून बाजुला ठेवू शकतो ते आपलं घर असतं.

कितीही बाहेर गेलो, लांब गेलो तरी ते आपल्याला क्षणोक्षणी दिसत राहतं. खुणावत राहतं. आजूबाजूच्या बहिरं करुन सोडणाऱ्या गर्दीतही आपल्याला आपल्या घराची हाक ऐकू येते, आणि आपण चटकन मागे वळून बघतो. ते मागे वळून पाहणं मला कायम हवंय. घरी परत जाण्याची भावना कायम हवीय. तुम्हाला काय वाटतं?”

सिद्धार्थची ही पोस्ट नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडलेली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे चाहतेही घरापासून लांब राहण्याचा त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. अनेक कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : video: ‘झिम्मा’ चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता सिद्धार्थ पुन्हा एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. या चित्रपटात तो सायली संजीव हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आले नसून, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे.