मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण यावेळी सिद्धार्थ आणि तृप्ती विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावर तृप्तीने केलेल्या बदलामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
आणखी वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसला हवी आहेत ११ मुलं!
तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असलेलं नावं बदलून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तृप्तीने नावामधील जाधव हे आडनाव काढल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते.
आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर
आणखी वाचा : “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला खूप अभिमान आहे”; वरुण धवनचे वक्तव्य चर्चेत
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
सिद्धार्थनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या हटके स्टाईल आणि डान्ससाठी सिद्धार्थ ओळखला जातो. सिद्धार्थनं ‘डान्स महाराष्ट्र डान्स सीझन १’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. लवकरच सिद्धार्थ तमाशा लाईव्ह आणि ‘दे- धक्का’ या २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.