सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे. दोन वर्षांनंतर गणेशोत्सवावरील निर्बंध मागे घेतल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सामान्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण गणरायाच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत. मुंबईमधील लालबाग-परळ परिसर गणेशभक्तांनी गजबजलेला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता मुंबईकरांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईमध्ये येत असतात. राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. सिद्धार्थने त्याच्या आईसोबत चालत जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. बॉलिवूडमधील बरेचसे सेलिब्रिटी दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. सिद्धार्थ मल्होत्रा व्यतिरिक्त कार्तिक आर्यन, काजल, अजय देवगन, रश्मिका मंदाना अशा अनेक सेलिब्रिटींनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

बाप्पाचे दर्शन घेतानाचा सिद्धार्थचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या आईसोबत अनवाणी चालताना दिसत आहे. सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी चप्पल न घालता अनवाणी चालत गेल्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्याच्या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी कमेंट केले आहे. एका चाहत्याने सिद्धार्थला ‘संस्कारी’ म्हटले आहे, तर दुसऱ्या चाहत्याने त्याच्या लूकची स्तुती केली आहे. दरम्यान बऱ्याच जणांनी या व्हिडीओखाली ‘कियारा कुठे आहे ?’ असा प्रश्न विचारला आहे.

‘शेरशहा’ या सुपरहिट चित्रपटामध्ये सिद्धार्थने कियारा आडवाणीसोबत काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘थॅंक गॉड’ हा सिद्धार्थचा नवा चित्रपट काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर सिद्धार्थने पोस्ट केले आहे. थॅंक गॉडमध्ये सिद्धार्थसह अजय देवगन, रकुल प्रीत सिंह या कलाकारांनी काम केले आहे.