गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार विवाहबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ-विकी कौशल, अभिनेता रणबीर कपूर आलिया भट्ट यांच्यापाठोपाठ आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अभिनेत्री कियारा आडवाणी हिने याबाबतचा खुलासा केला आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात बोलताना तिने याबाबतचा खुलासा केला आहे. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये तिने याबाबत सांगितले आहे.

बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर त्याचा शो ‘कॉफी विथ करण’च्या आगामी सीझनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमधून करण जोहर बॉलिवूड सेलिब्रेटीशी गप्पा मारताना दिसतो. सेलिब्रेटीच्या वैयक्तीक आयुष्यातील बऱ्याच सीक्रेट्सचा खुलासा करण जोहरच्या या शोमध्ये होताना दिसतो. करण जोहरचा हा शो प्रेक्षकांमध्ये बराच लोकप्रिय आहे. नुकतंच या शो च्या आठव्या भागात कियारा आडवाणी आणि शाहिद कपूर सहभागी झाले आहेत. या भागात त्यांनी प्रेम, कौटुंबिक आयुष्य, लग्न आणि इतर बॉलिवूडमधील गोष्टींवर चर्चा केली.
कुशल बद्रिकेच्या परफॉर्मन्सला अनिल कपूर- कियारानंही दिली दाद, व्हिडीओ एकदा पाहाच

कॉफी विथ करणच्या या भागात करण जोहरला सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खुलासा करताना ती म्हणाली, “सिद्धार्थ हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” यानंतर तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ती म्हणाली, “माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या आजूबाजूला अनेक छान छान विवाहसोहळे पाहिले आहेत. त्यामुळे मलाही माझ्या आयुष्यात ते घडताना पाहायचे आहे. पण हे कधी होईल हे मला सांगता येणार नाही.”

दरम्यान याआधी सिद्धार्थ मल्होत्राला त्याची कथित गर्लफ्रेंड कियारा अडवाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या शोमध्ये लोकांनी केलेल्या घोषणा कशा यशस्वी झाल्या हे सांगत असतानाच तो कियारासोबत लग्नाच्या प्लानबद्दल प्रश्न विचारतो, “कियारा आडवणीशी लग्न करण्याचा काही प्लान आहे का?” यावर सिद्धार्थने “मी आनंदी आणि उज्ज्वल भविष्याची घोषणा करतो.” असे उत्तर दिले होते.

‘सिम्बा’ ते ‘स्टुडंट ऑफ द इअर’, कियाराने नाकारलेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.

Story img Loader