अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोघांचा गेल्याच वर्षी आलेला ‘शेरशाह’ हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला. परमवीर चक्र मिळवणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातली दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. दोघे बऱ्याच ठिकाणी ते एकत्र दिसू लागले आणि त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा अफवा पसरल्या. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं असल्याच्याही अफवा समोर आल्या.
नुकताच कियाराने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर खुद्द सिद्धार्थने कमेंट केल्यामुळे त्यांचे फॅन्स पुन्हा तर्क वितर्क लावण्यात व्यस्त झाले आहेत. हा व्हिडीओ ‘शेरशाह’च्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा व्हिडीओ चित्रित केला होता. या व्हिडीओमध्ये कियारा गुलाबी रंगाच्या साडीत इंडिया गेटजवळ उभी आहे आणि तिच्यासमोर तिरंगा फडकतोय. याच व्हिडीओवर सिद्धार्थने कॉमेंट केली आहे की “मला क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद.” कियारासमोर झेंडा फडकवणारी व्यक्ती ही सिद्धार्थच आहे. या व्हिडीओमध्ये त्याला कट केल्याने त्याने अशी कॉमेंट केली आहे.
सिद्धार्थच्या कॉमेंटला कियाराने गंमतीशीर उत्तर दिलं. कियारा म्हणते “की तुझा हात तर दिसत आहे ना.” कियारा आणि सिद्धार्थच्या कॉमेंटवरून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना लग्नाविषयी प्रश्न विचारले आहेत. “तुम्ही दोघे जेव्हा लग्न कराल तेव्हा आम्हाला सांगाल ना?” असा प्रश्न त्यांचे चाहते त्या दोघांना विचारत आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याला व्हिडिओमधून वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे
सिद्धार्थ आणि कियारा दोघे एकमेकांना २०२१ पासून डेट करत असल्याचं म्हंटलं जातं. कियाराचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे दुबईलादेखील गेले होते. या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी अजून काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यांचे फॅन्स मात्र सोशल मीडियावर त्यांना लग्नाविषयी सतत विचारत असतात.
आणखीन वाचा : “सिद्धार्थ मल्होत्राची गर्लफ्रेंड असेपर्यंत कियाराचा एकही सिनेमा हिट होणार नाही”; केआरकेची भविष्यवाणी