दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल समांथा रुथ प्रभू आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. पण त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यानंतर समांथाचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सिद्धार्थने ट्वीट करत अप्रत्यक्षपणे समांथावर निशाणा साधला होता. आता सिद्धार्थने ते ट्वीट समांथासाठी नसल्याचे म्हटले आहे.

सिद्धार्थने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुखात दिली. या मुलाखतीमध्ये त्याला ते ट्वीट समांथाशी संबंधित होते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘जर लोक ते ट्वीट एखाद्या व्यक्तीशी किंवा स्वत:शी संबंधित असल्याचे ग्राह्य धरत असतील तर ती त्यांची समस्या आहे’, असे सिद्धार्थ म्हणाला.

आणखी वाचा : ‘मला मूल नको.. माझा गर्भपात झाला…’, समांथाच्या त्या पोस्टला रकुलचा पाठिंबा

काय होते सिद्धार्थचे ट्वीट?
‘शाळेतील शिक्षकांकडून शिकलेल्या पहिल्या धड्यांपैकी एक… चिटिंग करणाऱ्यांचे कधीही भले होत नाही… तुम्ही कोणता धडा शिकलात?’ या आशयाचे ट्वीट सिद्धार्थने केले होते. या ट्वीटच्या माध्यमातून सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे समांथावर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे. आता सिद्धार्थने या ट्वीट विषयी वक्तव्य केले असून ते ट्वीट कोणालाही उद्देशून नव्हते असे स्पष्ट केले आहे.

Story img Loader