अलीकडच्या काळात सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भटच्या लिव्हिंग रिलेशनशीप बद्दलच्या अफवा बॉलिवूड विश्वात रंगल्या होत्या. हे दोघे अनेकवेळा एकत्र दिसून आल्याने त्यांच्याविषयीच्या चर्चांना आणखीनच उधाण आले होते.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सिद्धार्थला आलिया बरोबरच्या लिव्हिंग रिलेशनशीप बद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, ‘आलिया बरोबर लिव्हिंग रिलेशनशीप ? नाही, असे काहीही नाही. आम्ही दोघे फक्त चित्रपटात एकत्र काम करतो, घर शेअर करत नाही’.
सिद्धार्थ आणि आलियाने स्टुण्ट ऑफ द इयर या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये एकत्र पदार्पण केले. मात्र, त्यानंतर ही जोडी कोणत्याही चित्रपटात एकत्र झळकली नाही. मात्र, आगामी कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटात हे दोघे अभिनेता फवाद खानसोबत झळकतील.

Story img Loader