चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्राने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अल्पावधीतच तो अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. आगामी ‘व्हिलन’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला बाय बाय करत तो जिममध्ये पंपिंग आयर्न करतोय. पिळदार शरीर बनवण्यासाठी सिद्धार्थ जिममध्ये घाम गाळत आहे. प्रत्येक दिवशी कठोर परिश्रम घेते दिवसागणिक व्यायामाची नवनवीन आव्हाने तो स्वत: समोर उभी करीत आहे आणि ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न देखील करत आहे. ‘व्हिलन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरीचे असून, यात सिद्धार्थबरोबर श्रद्धा कपूर दिसणार आहे. सिद्धार्थचा हा पिळदार लूक तरूणींना आवडेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Story img Loader