कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही बी-टाऊनमधील जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कियारा-सिद्धार्थ यांचे नेहमीच एकत्रित फोटो व्हायरल होताना दिसतात. या दोघांमध्ये नक्की काय नातं आहे याबाबत अनेक तर्क लावले जातात. कियारा-सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या फक्त चर्चा आहेत. मात्र रिलेशनशिपबाबत चर्चा सुरु असताना दोघांनीही मौन पाळणं पसंत केलं. आता तर कियारा-सिद्धार्थचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थने “फिलिंग गुड” म्हणत स्वतःचे स्टायलिस्ट फोटो शेअर केले आहेत, काही तासांमध्येच त्याच्या हा पोस्टला चांगलीच पसंती नेटकऱ्यांनी दिली आहे.


सिद्धार्थचा या फोटोमधील लुक अगदी खुलून दिसत आहे. सिद्धार्थने काळ्या रंगाचा शर्ट, जॅकेट, पँट आणि शर्टच्याच रंगाचे शूज परिधान केले आहेत. ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – रागाच्या भरात कुणाल खेमूला पत्नीने मारलं, VIRAL VIDEO तुम्हीही एकदा पाहाच

याआधीही त्याने बोटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. कियारा-सिद्धार्थने कधीच आपल्या नात्याबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं नाही. मात्र बऱ्याच ठिकाणी दोघं एकत्रित फिरताना दिसतात. पण आता त्यांच्या नात्याचा दि एण्ड झालं असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. पण सिद्धार्थची ही पोस्ट पाहून सतत होणाऱ्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत शंकाच निर्माण झाली आहे.

Story img Loader