करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केल्यानंतर सिद्धार्थने बॉलिवूडमधील आपले स्थान निश्चित केले आहे. पेटा संस्थेने या प्राणीमित्र अभिनेत्याला आगामी शुटसाठी करारबद्ध केले. माझ्या सहकलाकाराने शांती नावाच्या कुत्रीची शुटिंगस्थळी मदत केली. प्राण्याच्या प्रजननास आळा घालण्यास सहाय्य करा, असा संदेश सिद्धार्थने ट्विटरवर पोस्ट केला. सिद्धार्थ सध्या परिणिती चोप्राबरोबर ‘हसी तो फसी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.