गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सिद्धार्थ आणि कियारा बऱ्याचवेळा एकत्र दिसत असल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नुकताच त्या दोघांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्या दोघांची जोडी आणि त्यांच्यात असलेला रोमान्स पाहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. ते दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या लग्नाच्या प्लॅन विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिद्धार्थने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याच्या लग्ना विषयी आणि कियारासोबत लग्न करणार या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. सिद्धार्थला कधी लग्न करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मला माहित नाही माझे लग्न कधी होईल…मी ज्योतिषी नाही. लग्न कधी करणार या पेक्षा कोणाशी लग्न करणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी केव्हा आणि कोणाशी लग्न करेन हे मी नक्की सांगेन’, असे सिद्धार्थ म्हणाला.

सिद्धार्थला पुढे कियाराचा कोणता गुण आवडतो आणि अशी एक गोष्टी जी बदलण्याची इच्छा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘कियाराची मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे ऑफ-कॅमेरा ती पूर्णपणे वेगळी आहे. तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती एक अभिनेत्री आहे. ती सामान्य लोकांसारखी राहते आणि मला तिचा हा गुण आवडतो. मी मी स्वतः ऑफ कॅमेरा सामान्य लोकांसारखा राहतो.’

आणखी वाचा : याच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

कियाराची कोणतीही गोष्ट मला बदलायची नाही असे म्हणत सिद्धार्थ म्हणाला, ‘ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे.’ मात्र, त्यानंतर सिद्धार्थ म्हणाला, ‘एक गोष्ट मला नक्कीच बदलायला आवडेल ती म्हणजे तिची माझ्यासोबत कोणतीही लव्ह स्टोरी नाही.’ तर कियाराने त्याच्यासोबत एक लव्ह स्टोरी असलेला चित्रपट करावा अशी इच्छा असल्याचे सिद्धार्थने सांगितले.

आणखी वाचा : मित्राच्या घरी ड्रेस बदलणे उर्फी जावेदला पडले होते महागात, घरमालकाने दिली होती धमकी

दरम्यान, ‘शेरशाह’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये सिद्धार्थने कारगिल युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. तर कियाराने विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका साकारली होती.