बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भटची जवळीक हा बोलिवूडमधील चर्चेचा विषय आहे. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटात एकत्र दिसलेली ही जोडी ‘व्हॅलेंटाईन डे’ मात्र वेगवेगळा साजरा करणार आहेत. सिध्दार्थ ‘बार बार देखो’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. तर गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानसोबत दिसणारी आलिया चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात असेल. हा ‘व्हॅलेंटाईन डे’ आपण गौरी शिंदेबरोबर गोव्यात साजरा करणार असल्याचं तिने म्हटलं आहे. तर दुसरीकडे ‘बार बार देखो’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कतरिना कैफसोबत प्रस्थान करणार असल्याचं सिद्धार्थने म्हटलं आहे.

Story img Loader