अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच खुप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे चाहते देखील त्याच्या निधनाचे सत्य अद्याप पचवू शकले नाहीत. ते सिद्धार्थचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहते. सिद्धार्थ-शेहनाजच्या जोडीचे देखील असंख्य चाहते आहते. त्या दोघांमधील असलेली केमिस्ट्रि, बॉण्ड पाहुन त्यांच्या फॅन्सने त्यांना ‘सिडनाज’ असे नावं दिले आहे. सिडनाजचा किशोरवयातील एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सिद्धार्थच्या एका फॅन क्लबने सिडनाजचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तर शेहनाजने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोत सिद्धार्थ एकदम स्टाइलीश दिसत आहे  तर शेहनाज  खुप गोड दिसत आहे. या पोस्टवर चाहते कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले “माहित नाही कोणाची नजर लागली.” तर दुसऱ्या युजरने लिहिले “अजूनही असे वाटत आहे की कोणी तरी मस्करी करत आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले आम्ही तुला खुप मिस करतो..”. या पोस्टला ‘तरुणपणातील फोटो’ असे कॅप्शन दिले आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली असून ती सोशल मीडियापासून देखील दूर राहिली आहे. सिद्धार्थचे निधन 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सिद्धार्थ बरोबरच्या असलेल्या आठवणी शेअर करत सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण करीत आहेत

Story img Loader