छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थचा मृतदेह सध्या कूपर रुग्णालयात आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. सिद्धार्थच्या निधनाचा सगळ्यात मोठा धक्का हा त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला बसला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेहनाजचे वडील संतोख सिंह यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज ही बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे.

‘ईटाम्स’ला सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घरी परतला आणि अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी सिद्धार्थची आई आणि शेहनाज त्याच्या घरी होत्या. आधी त्यांनी सिद्धार्थला लिंबूपाणी दिले आणि नंतर आईस्क्रीम खायला दिली. जेणेकरून सिद्धार्थला आराम मिळेल. मात्र, सिद्धार्थला होणारा त्रास कमी झाला नाही. त्याच्या छातीत दुखणे सुरु होते. हे पाहता त्याच्या आईने आणि शेहनाजने त्याला आराम करायला सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सिद्धार्थला झोप येत नव्हती तर त्याने शेहनाजला त्याच्या जवळ झोपायला सांगितले आणि पाठीवर थाप मारण्यास सांगितले. रात्री दीडच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाजच्या मांडीवर झोपला आणि त्याचा झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर शेहनाजला ही झोप आली आणि ती झोपली. जेव्हा सकाळी ७ च्या सुमारास शेहनाज उठली तेव्हा तिने पाहिले की सिद्धार्थ रात्रभर त्याच स्थितीत झोपला होता आणि त्याची काही हालचाल नव्हती. हे पाहून शेहनाजने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीही हालचाल केली नाही.

आणखी वाचा : डोळे बंद करुनही सिद्धार्थला ओळखायची शेहनाज, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल रडू

शेहनाजला काही कळतं नव्हते आणि ती धावात १५ व्या मजल्यावरूव ५ व्या मजल्यावर त्याच्या आईच्या घरी गेली. त्यांनी लगेच त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला. फॅमिली डॉक्टर जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी सिद्धार्थला मृत घोषित केले.

आणखी वाचा : ‘एक दिवस तुमचे निधन होते आणि मग…’, विवेक अग्निहोत्री यांनी मांडली बॉलिवूडची डार्क साइड

सिद्धार्थ आणि शेहनाजची भेट ही ‘बिग बॉस १३’ मध्ये झाली होती. त्यावेळी त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. चाहत्यांनी त्यांची जोडी फार आवडायची आणि त्यांनी या दोघांच्या जोडीला सिदनाज हे नाव देखील दिलं होतं. शेहनाजला सिद्धार्थशी लग्न करायचे होते. आता सिद्धार्थचे अचानक निधन झाल्याने शेहनाजला धक्का बसला आहे.

Story img Loader