टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र आजही सोशल मीडियावर त्याचे बरेच चाहते आहेत. वयाच्या ४० व्या वर्षीच जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याची लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड कलाकारापेक्षाही कमी नव्हती. टीव्ही मालिका ‘बालिका वधू’मुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांमध्ये बिग बॉस १३ नंतर कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळाली होती. बिग बॉसच्या घरात तो नेहमीच वाद, भांडणं आणि शहनाझ गिलशी त्याची मैत्री या कारणांनी चर्चेत राहिला होता. पण वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहण्याची त्याची पहिलीच वेळ नव्हती. त्याअगोदरही वेगवेगळ्या वादांमुळे सिद्धार्थ शुक्ला चर्चेत राहिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ शुक्ला एकदा वेगाने गाडी चालवल्यामुळे अडचणीत सापडला होता. ही घटना खूप जुनी आहे. भरधाव गाडी चालवल्याने त्याला ट्राफीक पोलिसांनी चांगलंच फैलावर घेतलं होतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार यावेळी त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं होतं. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला त्याच्या तापट स्वभावासाठीही ओळखला जायचा. त्याचा या स्वभावाचा अनुभव त्याच्यासोबत काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांना आला होता.
आणखी वाचा-‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडेने गाठलं थेट मथुरा, ‘हे’ आहे त्यामागचं कारण

टीव्ही मालिका ‘दिल से दिल तक’च्या सेटवर सिद्धार्थ शुक्ला आणि कुणाल वर्मा यांचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर कुणालने सिद्धार्थवर बरेच गंभीर आरोप लावले होतं. मीडिया रिपोर्टनुसार मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं आणि त्यानंतर सिद्धार्थने कुणालवर पाणी फेकलं होतं. या व्यतिरिक्त २०१४ मध्ये सिद्धार्थवर दारुच्या नशेत गाडी चालवल्याचा आरोपही लावण्यात आला होता. यासाठी त्याला दोन हजार रुपये दंड भरावा लागला होता.

आणखी वाचा- सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांची चाहत्यांना विनंती, शहनाजनंही शेअर केली पोस्ट

बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील भांडण बरंच गाजलं होतं. पण त्याआधीही या दोघांमध्ये बरेच वाद झाले होते. दोघांनी ‘दिल से दिल तक’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या शोच्या वेळी यांच्यात वाद झाल्याचं बोललं जातं. काही रिपोर्ट्सनुसार या शोदरम्यान दोघंही एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth shukla first death anniversary know about his controversy mrj