Sidhu Moosewala Brother Face Reveal: दिवंगत पंजाबी रॅपर व गायक सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर त्याचे आई- वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी मुलाचे नाव शुभदीप ठेवले, जे दिवंगत गायकाचेही नाव होते. सिद्धू मूसेवालाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या आई-वडिलांनी शुभदीपचा फोटो व व्हिडीओ शेअर केला आहे.
७ नोव्हेंबर रोजी बलकौर व चरण कौर यांनी सिद्धू मूसेवालाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पहिल्यांदाच धाकटा मुलगा शुभदीपचा फोटो शेअर केला. त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाचा चेहरा सर्वांना दाखवला. या फोटोत चिमुकला शुभदीप खूपच गोंडस दिसत आहे. फोटोमध्ये चिमुकला शुभदीप वडील बलकौर सिंग यांच्या मांडीवर बसला आहे. तर त्याची आई चरण कौर शेजारी बसल्या आहेत. हे तिघेही कॅमेऱ्याकडे बघून पोज देत आहेत. चिमुकल्या शुभदीपच्या पगडीने लक्ष वेधून घेतले आहे.
पाहा पोस्ट –
शुभदीपचा हा फोटो पाहून चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी ‘किंग इज बॅक’ म्हटलंय. तर काहींनी ‘सिद्धू इज बॅक’ अशा कमेंट्स या फोटोवर केल्या आहेत. अनेकांनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत.
दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिध्दू मूसेवाला याची २०२२ साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी मोठा निर्णय घेतला. चरण कौर या आयव्हीएफ टेक्नॉलॉजीद्वारे ५८ व्या वर्षी गरोदर राहिल्या. त्यांनी मार्च २०२४ मध्ये मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव शुभदीप ठेवलं. सिद्धू मूसेवालाचं खरं नाव शुभदीप होतं.