सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांना गेल्या महिन्यात एक आनंदाची मिळाली. सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई चरण कौर गर्भवती असून मार्च महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचं वृत्त आलं होतं. आता सिद्धूच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चरण कौर या जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस असण्यासाठी सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी हा निर्णय घेतला. सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर गर्भवती राहिल्या आहेत. त्यामुळे सध्या मुसेवाला कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. चंडीगढमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सिद्धूच्या आईला दाखल करण्यात आलं असून दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

हेही वाचा – “मला अतिशय अभिमान…”, मधुरा वेलणकरने सासरे शिवाजी साटम यांचं केलं कौतुक, म्हणाली, “२३ वर्ष CID…”

दरम्यान, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती.

हेही वाचा – “माझ्या आयुष्यातल्या…”, पूजा सावंतची बहिणीसाठी खास पोस्ट; रुचिरा सावंत काय काम करते? जाणून घ्या…

सिद्धूची संपत्ती

सिद्धूच्या निधनानंतर नेटवर्थसंबंधित आलेल्या बातम्यांनुसार, तो १४ मिलियन म्हणजे ११४ कोटी रुपये मागे सोडून गेला आहे. सिद्धू एका लाइव्ह कॉन्सर्टसाठी २१ लाख रुपये मानधन घेतं असे. ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिका आणि कॅनडापर्यंत त्याच्या कॉन्सर्टची मागणी होती. सिद्धूकडे आलिशान गाड्या होत्या. रेंज रोवर, इसुजू डी-मॅक्स, मर्सिडीज एएमजी 63, मस्टँग, फॉर्च्यूनर, जीप आणि टोयोटा यांसारख्या आलिशान गाड्या होत्या. याशिवाय सिद्धूला महागड्या बाइक्सची देखील खूप आवड होती. पंजाब, कॅनडामध्ये सिद्धूचं आलिशान घर आहे. सिद्धूच्या निधनानंतर त्याच्या गाण्यातून जबरदस्त कमाई झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhu moosewala mother chandigarh private hospitalized pps
Show comments