सुप्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी पुन्हा पाळणा हलला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह व आई चरण कौर यांना दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. आज सकाळी सिद्धूच्या वडिलांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली. तेव्हापासून सिद्धू मुसेवाला सोशल मीडियावर ट्रेड होतं आहे. “किंग इज बॅक”, असं नेटकरी म्हणत सिद्धूच्या आई-वडिलांना शुभेच्छा देत आहेत.
चरण कौर वयाच्या ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोंडस बाळाची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर करत सिद्धूचे वडील म्हणाले, “शुभदीपच्या (सिद्धू मुसेवाला) लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या आशीर्वादाने ईश्वराने आम्हाला सिद्धूचा छोटा भाऊ दिला आहे. ईश्वराच्या कृपेनं कुटुंब निरोगी आहे आणि मी आमच्या शुभचिंतकांचे आभार मानतो. वाहेगुरूने आम्हाला दिलेल्या या आशीर्वादाबाबत ऋण व्यक्त करतो.”
हेही वाचा – Video: Ed Sheeranच्या सुरेल आवाजात दंग झाला शाहरुख खान, मन्नतमधील Unseen व्हिडीओ व्हायरल
सध्या सिद्धूच्या छोट्या भावाचा जन्म झालेल्यानंतरचा हॉस्पिटलमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चिमुकल्या लेकाला पाहिल्यानंतर सिद्धूच्या आई-वडिलांची रिअॅक्शन पाहायला मिळत आहे. या खास क्षण बलकौर सिंह हॉस्पिटलमधल्या स्टाफसह साजरा करताना दिसत आहेत.
हेही वाचा – सिद्धू मुसेवाला मागे सोडून गेलाय कोट्यवधींची संपत्ती
या व्हिडीओवर, सिद्धूच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी बलकौर व चरण यांना शुभेच्छा देत आहेत. तर कोणी सिद्धू परत आला असं म्हणत आहेत.