साठ-सत्तरच्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून सिमी गरेवाल यांना ओळखले जाते. ‘मेरा नाम जोकर’, ‘सिध्दार्थ’, ‘साथी’, ‘हाथ की सफाई’, ‘नमक हराम’ या अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी सर्वांचीच मन जिंकली. मात्र अभिनयाबरोबरच सिमी यांच्या लव्ह लाईफचीही तितकीच चर्चा पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहितीये का? सिमी गरेवाल आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासाही केला होता.

सिमी गरेवाल यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्यांचा ‘Rendezvous with Simi Garewal’ हा टॉक शो चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी झाले होते. उद्योगपती रतन टाटाही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्य, लग्न, रिलेशनशिप यावरही भाष्य केले होते. सिमी गरेवाल आणि रतन टाटा हे एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना त्याकाळी प्रचंड उधाण आले होते. पण त्यानंतर सिमी यांनी याबद्दल खुलासा केला होता.
आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग

mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

सध्या सिमी गरेवाल यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. जवळपास ११ वर्षांपूर्वी ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिमी यांनी रतना टाटांबरोबर असलेल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. यावेळी त्या म्हणाल्या, “रतन टाटा आणि माझे फार पूर्वीपासूनचे नाते होते. ते फारच परिपूर्ण आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर फारच चांगला आहे. ते एकदम सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. ते परदेशात फारच आरामात जीवन जगतात. भारतात मात्र ते फार व्यग्र असतात.”

“मी चांगलं दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात लगेच पडते ही माझी समस्या आहे. मी पुरुषांच्या बाबत फार उथळ आहे. पण आता मी बदलत आहे. मला विनोदी आणि दयाळू माणसं फार आवडतात. माझे जामनरमधील महाराजांबरोबरही नातेसंबंध होते. ते माझ्या शेजारीच राहायचे. या नात्यामुळे मला प्रेम, मत्सर याबद्दल खूप काही शिकायला मिळाले”, असाही खुलासा त्यांनी केला.

आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

सिमी गरेवाल यांनी १९८८ मध्ये सिनेसृष्टीला रामराम केला. त्यानंतर १९९७ मध्ये त्या ‘Rendezvous with Simi Garewal’ या टॉक शोमुळे चर्चेत आली. आजही हा शो प्रचंड लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सिमी या सिनेसृष्टीपासून दूर असल्या तरी त्या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.

Story img Loader