अॅक्शन, ड्रामा, रोमान्सने परिपूर्ण असा मनोरंजनाचा पॅकेज म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ हा चित्रपट. ‘गोलमाल’ प्रमाणे ‘सिंघम’ फ्रँचाईझी पुढे नेण्याचा हा शेट्टी फॉर्म्युला हिट ठरला आहे. शेट्टी स्टाईल मनोरंजन, जबरदस्त कलाकार असलेल्या ‘सिम्बा’ने अवघ्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतात सिम्बाने आतापर्यंत तब्बल १७३.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारताबाहेरील कमाई यात लक्षात घेता ‘सिम्बा’ने २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती दिली आहे.
‘सिम्बा’च्या धडाकेबाज कामगिरीमुळे रणवीर सिंगचा हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी ‘बाजीराव मस्तानी’ने तिकीटबारीवर जोरदार कमाई केली होती. शुक्रवारी ९.०२ कोटी आणि शनिवारी १३.३२ कोटी रुपये मिळून ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटी रुपये इतकी झाली आहे. ‘सिम्बा’ने फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही चांगली कमाई केली आहे. विदेशात या चित्रपटाने आठ दिवसांत ६३. २२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारत आणि भारताबाहेरच्या एकूण कमाईने २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
#Simmba is ruling the BO… Witnesses superb growth on second Sat… Expected to collect bigger numbers today… Will emerge Ranveer’s second highest grosser today, surpassing #BajiraoMastani… [Week 2] Fri 9.02 cr, Sat 13.32 cr. Total: ₹ 173.15 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 6, 2019
#Simmba nears $ 10 million mark in international markets…
[Week 2]
Fri $ 683k
Sat $ 793k
Total: $ 9.884 million [₹ 68.76 cr]#Overseas— taran adarsh (@taran_adarsh) January 6, 2019
रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. सैफ अली खानची मुलगी साराचा हा दुसराच चित्रपट. पहिल्याच चित्रपटात तिने आपण तोडीस तोड असल्याचे सिध्द केले होते. इथे खरे म्हटले तर दोन-चार प्रसंग आणि दोन गाणी वगळता तिला करण्यासारखे काही नाही. मात्र जेवढा वेळ ती पडद्यावर आहे तेवढय़ा वेळातला तिचा सहजवावर तेवढाच प्रभावी ठरला आहे. रणवीर आणि साराची जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे.