दिग्दर्शक साजिद खान याच्यावर अनेकींकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप होत आहेत. त्यात आता आणखी भर पडली असून अभिनेत्री सिमरन कौर सूरी हीनेही साजिदने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे म्हटले आहे. ‘हिम्मतवाला’ चित्रपटामधील भूमिकेसाठी साजिदने मला स्वत:हून फोन करुन ऑडीशनसाठी बोलावले होते. त्यावेळी त्याने मला कपडे उतरवायला लावले असे तिने एका खासगी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केल्याने ही अतिशय व्यावसायिक स्वरुपाची भेट असेल असे मला वाटले होते. मात्र साजिद त्याच्या घरातल्या कपड्यांमध्ये होता असेही सिमरन म्हणाली. त्याचे असे वागणे पाहून मला धक्का बसला आणि मी त्याठिकाणहून निघून आल्याचे तिने सांगितले.

सिमरन पुढे म्हणाली, चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्यक असते असे साजिदने सांगितले. त्याला मी नकार देऊन आवाज वाढवल्यावर आवाज कमी कर घरात माझी आई आहे असेही तो म्हणाला. मी घरातून निघून गेल्यावर लगेचच त्याचा मोबाईल नंबर डिलीट केला. मात्र त्याने काही वेळात मला पुन्हा फोन केला. आपल्याला सोबत काम करायचे असेल तर आपण नीट राहायला हवे असे तो म्हणत होता. मात्र मला पुन्हा फोन करु नको असे सांगून मी त्याचा फोन कट केला.

महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनंतर अभिनेत्री बिपाशा बासू हीने साजिदवर आरोप केले होते. तर काही सलोनी चोप्रा आणि रॅचेल व्हाइटनेही साजिदच्या चुकीच्या वागण्याला वाचा फोडली होती. त्यानंतर काल बिपाशा बासू हीनेही साजिद खानचे सेटवर महिलांशी वागणे खटकणारे असायचे असे म्हटले होते. साजिदवरील आरोपांमध्ये वाढ होत असताना त्याच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटात काम करणार नसल्याचे अभिनेता अक्षयकुमार याने सांगितले होते. तर साजिदची बहिण असलेल्या फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननं म्हटलं आहे.

Story img Loader