प्रसिद्ध गायक अंकित तिवारी हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. ‘आशिकी २’ या चित्रपटातील ‘सून रहा है ना तू’ आणि गलिया या गाण्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच अंकितने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलवर गैरवर्तनचा आरोप केला आहे. त्याने याबाबतचा एकही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत अंकितने सर्व दिल्लीतील या हॉटेलमध्ये त्याला कशाप्रकारे त्रास झाला, त्याच्या चार वर्षीय मुलीला उपाशी झोपावे लागले याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकित तिवारीने काही तासांपूर्वी ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. “हॉटेल रॉयल प्लाझा, नवी दिल्ली. या ठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला एखाद्या कैद्याप्रमाणे वाटत आहे. फार वाईट अनुभव. या पंचतारांकित हॉटेलमध्ये ना पाणी आहे, ना जेवण. जेवणाची ऑर्डर करुन ४ तास उलटले आहे. तसेच या हॉटेलमध्ये बाहेरुन खाणे आणण्याची परवानगी देखील नाही. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि जर तुम्ही काहीही बोललात तर तुम्हाला हॉटेलचे कर्मचारी बाऊन्सरची धमकी देतात”, असे त्याने म्हटले आहे.

त्यासोबत शेअर केलेल्या व्हिडीओत त्याने त्या हॉटेलची स्थिती दाखवली आहे. हा व्हिडीओ १ मिनिटे २९ सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ हॉटेलच्या परिसरात शूट करण्यात आला आहे. एका व्यक्तीने शूट केलेल्या या व्हिडीओत त्याच्या बाजूला अंकित तिवारी उभा असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच इतर लोकही तिथे दिसत आहेत. हा व्हिडीओ शूट करणारी ती व्यक्ती असे विचारते की, ‘काय झालं तुम्ही इतक्या रात्री खाली का आहात? त्यावर तो म्हणतो की मला काल रात्रीपासून फार अस्वस्थ वाटत आहे.’

‘मला पहाटे ५ वाजता झोप लागली. मी माझ्या कुटुंबासह हरिद्वारला आलो होतो. त्यावेळी दिल्लीत एक रात्र मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी वृदांवन फिरण्यासाठी जायचे, असा आमचा प्लॅन होता. त्यासाठी आम्ही दिल्लीतील रॉयल प्लाझा या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर चेक इन करण्यासाठी ४५ मिनिटे लागली’, असे अंकित म्हणाला.

‘त्यानंतर आम्ही आमच्या खोलीत गेलो आणि तिथून जेवणाची ऑर्डर दिली. पण तीन तास उलटून गेले तरी जेवण- पाणी काहीही आले नाही. माझी मुलगी तीन वर्षांची आहे. तिच्यासाठी आम्ही दूध मागवले होते. पण तेही आतापर्यंत आलेले नाही. रुम सर्व्हिससाठी फोन केला तर कोणी उचलत नाही. याबाबत मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी बोलल तर ते मला उलट सुलट बोलू लागले. तसेच त्यांनी शिवीगाळ करत मला सुरक्षारक्षकांची भीती घातली’, असा दावा अंकितने केला आहे.

यानंतर पुढे तो म्हणाला, ‘मी हॉटेलवाल्यांना माझे पैसे परत करा. मी चेकआऊट करतो असे सांगितले. तर त्यावेळीही हॉटेलच्या मॅनेजमेंटने माझे काहीही ऐकले नाही. हॉटेलचा मॅनेजर या परिस्थिती हसताना दिसत आहे. मी एवढ्या रात्री माझ्या पत्नी आणि मुलासोबत कुठे जाणार? मी आतापर्यंत कधीही अशाप्रकारच्या पोस्ट केलेल्या नाही. पण आता या हॉटेलमधील हे गैरवर्तन चुकीचे आहे. जर हे लोक आम्हा कलाकारांसोबत असे करत असतील तर सामान्य लोकांचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी,’ अशीही मागणी त्याने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer ankit tiwari complains delhi five star hotel misbehaved did not provide milk for three year old daughter nrp