गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि अभिनेत्री पर्ण पेठे यांचा वाढदिवस गुरुवारी व्हॉलीबॉल सामन्यानंतर अलरहाबीच रिसॉर्टवर केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी अवधूत गुप्ते यांनी गाणे गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या व्हॉलीबॉल सामन्यावेळी उपस्थित होत्या. वाढदिवसानिमित्त गुप्ते व पर्ण पेठे यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिष्टचिंतन केले.
शुक्रवारी झालेल्या कलर्स मिक्ता पुरस्कार सोहळ्याचे विशेष प्रसारण पुढील महिन्यात ई टीव्ही मराठी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. 

Story img Loader