अभिनेत्री या कायम त्यांच्या लूक आणि कपड्यांमुळे चर्चेत असतात. एखादी पार्टी असो वा पुरस्कार सोहळा त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पण कधीकधी याच अभिनेत्री कपड्यांमुळे Oops Momentच्या शिकार होतात. असेच काहीसे ब्रिटीश गायिका चार्ली एक्ससीएक्ससोबत झाले आहे.
चार्लीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन रेकॉर्डिंग असोसिएशन म्यूझिक अवॉर्ड्समधील आहे. बुधवारी तिने या अवॉर्ड शोला हजेरी लावली होती. दरम्यान तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. पण या वेळी कॅमेरा समोर बोलत असताना अचानाक तिचा ड्रेस खांद्यावरुन खाली घसरला आहे. चार्लीने तो कसाबसा सांभाळला आहे. हा व्हिडीओ शेअर करत चार्लीने विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. पण तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी वाचा : सलमान खान ऑनस्क्रीन किसिंग सीन आणि इंटिमेट सीन का देत नाही?; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
हा एक व्हर्चुअल अवॉर्ड शो होता. या शोमध्ये चार्ली द किड लारोई (The kid Laroi) आणि जस्टिन बीबर यांना बेस्ट पॉप रिलिज अवॉर्ड देत होती. त्याच वेळी अचानक तिचा ड्रेस खांद्यावरुन खाली आला. ती कसाबसा तो सांभाळते आणि हसत Oops momentला मजेशीर करण्याचा प्रयत्न करते.
असे पहिल्यांदाच झालेले नाही की चार्ली Oops momentची शिकार झाली आहे. २०१८मध्ये एनिजोनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेलर स्विफ्ट रेप्यूटेशन टूरमध्ये परफॉर्म करताना देखील ती Oops momentची शिकार झाली आहे. तेव्हा देखील तिने ते मजेशीर अंदाजात सांभाळले होते.