प्रसिद्ध संगीतकार जोडी अरमान आणि अमल मलिक यांच्या आजीचं निधन झाले. रविवार २५ जुलै रोजी कौसर जहां मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला. आजीच्या निधनानंतर मलिक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कौसर जहां मलिक यांच्या निधनामागचे कारण अद्याप कळले नसून त्यांच्या निधनाची बातमी अनु मलिकच्या भाच्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितली. अरमानने भावूक होवून एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अरमानने त्याच्या आजीला घट्ट मिठी मारलेली असल्याचे दिसून येत आहे. तसंच यात अरमान आणि त्याच्या आजीमधील गोड नाते देखील दिसून येत आहे. या पोस्ट खाली अरमानने लिहले की ” आज माझी सर्वात जवळची मैत्रीण लांब गेली. ती माझ्या आयुष्यातला प्रकाश होती.” तिच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. माझा अजून विश्वास बसत नाही की, ती आमच्या बरोबर नाही. आजी तुझे हग्स आणि किससाठी मी आभारी असेन. अल्ला आता माझी ऐंजल (आजी) तुझ्या बरोबर आहे.
View this post on Instagram
पुढे अमल मलिकने देखील त्याचा आजी सोबतचा फोटो पोस्ट केला. “आज माझ्या स्वत: च्या हातांनी तुला दफन करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काम होते. मी शेवटच्या मिठीसाठी हताशपणे ओरडलो, परंतु तू आधीच गेली होतीस. तुला तुझ्या पती शेजारी दफन करण्याची तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो यात आम्हाला आनंद आहे. तू गेल्यावर पाऊस पडायला सुरवात झाली आणि मी आकाशाकडे पाहत राहिलो हे चित्र (अमलने त्याच्या आजी आजोबांचा जुना फोटो शेअर केला आहे) समजून घेत हसलो, जिथे तुला हवे आहे तिथे तू बरोबर आहेस.” असे कॅप्शन देत मोठी पोस्ट लिहली.
View this post on Instagram
अशा प्रकारे मलिक कुटुंबियांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. तसंच बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील मलिक परिवाराचं सांत्वन करत कौसर जहां मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली.