प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. केके यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोलकातामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार ५३ वर्षीय केके यांचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जातं. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान पुढच्या काही तासांमध्ये हा गायक अशाप्रकारे जगाचा निरोप घेईल असं कोणाला वाटलंही नव्हतं. पण अखेरच्या काही क्षणांमध्ये काय घडलं याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाताच्या गुरुदास कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करताना गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके यांची तब्येत अचानक बिघडू लागली होती. परफॉर्म करत असताना ते वारंवार आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना अस्वस्थ असल्याचं दिसत होतं. पण प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीही उणीव राहू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. कॉन्सर्टमधील अखेरच्या काही क्षणांमध्ये ते कधी टॉवेलने चेहऱ्यावरील घाम पुसताना, कधी पाणी पिताना तर कधी तर कधी स्टेजवरच इथून तिथे फिरताना दिसत आहे. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी आपला परफॉर्मन्स चालू ठेवला होता.

आणखी वाचा- KK Love Story : बालमैत्रिण ते पत्नी… अशी होती ‘केके’ची लव्ह स्टोरी!

केके यांना जेव्हा जास्त त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी आयोजकांना स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितलं. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास केके यांनी लाइव्ह कॉन्सर्ट संपवलं आणि ते हॉटेलमध्ये परतले. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली. त्यांना १०.३० वाजता कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यावेळी त्या ठिकाणी रुग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा- कसं झालं गायक ‘केके’चं निधन? वाचा कोलकाता कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं

दरम्यान ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या सुत्रांनी केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत.

आज कोलकात्यामधील सएसएकेएम रुग्णालयामध्ये केके यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. पोलीस ग्रॅण्ड हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहेत. तसेच ते या हॉटेलमधील कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चौकशी करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer kk dies at the age of 53 in kolkata watch video of his some last moments mrj