गायिका प्रियांका वर्बेने तिच्या गोड आवाजाने अनेकांची मने जिंकली आहेत. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. प्रियांकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका एका म्युझिकल शो साठी अमेरिकेला गेली होती. तब्बल ४२ दिवसांनंतर ती भारतात परतली. जेव्हा ती मुंबई विमानतळावर उतरली तेव्हा तिचा ३ वर्षाचा मुलगा युवान कुटुंबाबरोबर तिथं आला होता. प्रियांकाने युवानचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा- “आता कुणाविषयी प्रेम, आदर वाटत नाही”, मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, “तुमची राजकीय चिखलफेक…”
व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने लिहिलं आहे. “एका फॅब शोनंतर मी भारतात परतले आहे. तब्बल ४२ दिवसांनंतर मी माझ्या मचकिंगला भेटत आहे. या संपूर्ण काळात तो स्वतः एक प्रेरणा बनला होता. मला पाठिंबा देणारं कुटुंब भेटल्याचा मला आनंद आहे. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते.”
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये ‘मुघल-ए-आझम : द म्युझिकल’ शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये प्रियांका बर्वेने ‘अनारकली’ची भूमिका साकारली होती. याबाबत प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती. “न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध लिंकन सेंटरमधील डेव्हिड एच कोच नाट्यगृहात या शोचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाअगोदर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर परिसरात ‘मुघल-ए-आझम’च्या फ्लॅश मॉब घेण्यात आला होता. या फ्लॅश मॉबमध्ये मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुनयनाही सहभागी झाली होती. ‘मुघल-ए-आझम :द म्युझिकल’चे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले होते.
‘संगीत सम्राट’ या शोच्या सूत्रसंचालनानं प्रियांका घराघरांत पोहोचली. ‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ याच्या पार्श्वगायनासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला. अलीकडेच येऊन गेलेल्या ‘आनंदी गोपाळ’मधील ‘वाटा वाटा वाटा गं’ हे तिचं गाणंसुद्धा चांगलंच लोकप्रिय झालं. त्याआधी ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केलं. त्यासोबतच ‘मला सासू हवी’ आणि ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांची शीर्षकगीतंही प्रियांकानं गायलीत.