बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल गुरूवारी तिचा प्रियकर शिलादित्य मुखोपाध्याय याच्यासह विवाहबंधनात अडकली. तिने ट्विटरवरून यासंबंधीची माहिती दिली. नवी दिल्ली येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी समारंभात या दोघांचा विवाह झाला. मित्रमंडळी आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत शिलादित्य आणि माझा बंगाली रितीरिवाजाने विवाह झाल्याचे श्रेयाने सांगितले. आमच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळोत, अशी अपेक्षाही तिने ट्विटरवर व्यक्त केली. गेले अनेक वर्षे आपल्या मधूर आवाजातील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना तृप्त करणाऱ्या श्रेयाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

 

Story img Loader