‘बिग बॉस’ हिंदीतून ओळख मिळालेली अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. ‘बिग बॉस’मुळे तिला लोकप्रियता मिळाली आणि अनेक सेलिब्रिटींबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. अशातच बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका सोना मोहपात्राने शहनाजवर टीका केली आहे. तिच्यात काय टॅलेंट आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचं सोनाने म्हटलं आहे.

“ज्या देशाशी तुमचे संबंध…” पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर रणबीर कपूरची प्रतिक्रिया

अलीकडेच शहनाज गिल एका कार्यक्रमात पोहोचली होती. तिथे तिला गाणं गाण्यास सांगण्यात आलं. गाताना शहनाजला अजानचा आवाज आला आणि ती थांबली. लोकांनी शहनाजच्या या कृतीचं खूप कौतुक केलं होतं. शहनाजची ही कृती पाहून सोना मोहपात्राला शहनाजने ‘बिग बॉस १६’ मध्ये पोहोचलेल्या साजिद खानला पाठिंबा दिल्याचा दिवस आठवल्याचं म्हटलं.

“आपल्याच लोकांनी मी चुकत…” सातारा कोर्टात तक्रार दाखल झाल्यानंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

“लैंगिक शोषण करणारा एक गुन्हेगार नॅशनल टीव्हीवर दाखवला गेला. त्यामुळे तिने (शहनाज) शोषण झालेल्या बहिणींबद्दल थोडा आदर ठेवायला हवा होता”, असं ट्वीट सोनाने केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर शहनाजच्या चाहत्यांनी सोनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोना शहनाजला टार्गेट करत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं होतं.

वाढतं ट्रोलिंग आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून सोना मोहपात्राने पुन्हा एक ट्वीट केलं. “प्रिय ट्रोल जॅकलिनसारख्या दुसर्‍या अभिनेत्रीसाठी उभं राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला माहीत नाही की शहनाजचं खास टॅलेंट काय आहे? सध्या तर फक्त ती टीव्ही रिअॅलिटी शो आहे. मला अशा महिला माहीत आहेत, ज्या शॉर्टकटद्वारे चांगले पैसे कमवतात,” असं दुसऱ्या ट्वीटमध्ये सोना म्हणाली.

दरम्यान, सोना मोहपात्राने केलेल्या या टीकेवर अद्याप शहनाजची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.