नव्वदच्या दशक गाजवलं ते तीन खान मंडळींनी, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान. सध्या या तिघांच्या चित्रपटाला फारसे यश मिळालेले नाही, मात्र त्याकाळात तिघांमध्ये चांगलीच स्पर्धा होती. यातील सलमान खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘मैने प्यार किया’ हा त्याचा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाचे नायक नायिका दोघे नवीन होते. सलमान खान भाग्यश्री या दोन्ही कलाकरांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र सलमानला खरी ओळख मिळाली ती यातील गाण्याला ज्या गायकाने आवाज दिला त्या गायकामुळे, ‘आजा शाम होने आयी’, ‘मेरे रंग मै’सारखी गाणी सुपरहिट ठरली.
या अजरामर गाण्यांमागे आवाज होता तो एका दाक्षिणात्य गायकाचा, त्या गायकाचं नाव म्हणजे एस. पी. बालसुब्रमण्यम, साठच्या दशकापासून त्यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरवात केली होती. ते अगदी काही वर्षांपूर्वी आलेल्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात त्यांनी गाणे गायले आहे. नव्व्दच्या दशकात सलमानच आवाज म्हणून एस. पी यांनाच घेतले जायचे. ‘लव्ह’, ‘हम आपके हैं कौन’, ‘पत्थर के फुल’, ‘साजन’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सलमानसाठी त्यांनी पार्शवगायन केले होते. सलमानचा आवाज म्हणून ते प्रसिद्ध झाले होते.
‘पेहला नशा’ गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
एसपी बालसुब्रमण्यम यांनी हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि अनेक पुरस्कारही जिंकले. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणनेही गौरविण्यात आले होते. पाच दशकांच्या कारकिर्दीत, त्यांनी संगीतकारांच्या अनेक पिढ्यांसह काम केले आहे आणि ४०,००० हून अधिक गाणी गायली आहेत. ज्यासाठी त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. एसपी बालसुब्रमण्यमनंतरच्या काळातही अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्यौला बालसुब्रमण्यम असे होते. आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी बालसुब्रमण्यम यांनी जेएनटीयू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अनंतपूर येथे प्रवेश घेतला कारण त्यांच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी इंजिनियर व्हावे, मात्र संगीताचा ध्यास घेतल्याने त्यांनी आपले करियर संगीतात केले. बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी करोनामुळे चेन्नईच्या रुग्णालयात निधन झाले.