अभिनेता अक्षय कुमार आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अक्षय कुमार आणि त्याचा पार्टनर अश्विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’च्या बॅनरखाली ‘सिंग इज ब्लिंग’ चित्रपटाची निर्मिती होणार असून अभिनेता-नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे ‘रावडी राठोड’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अक्षय आणि प्रभुदेवाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल गाजवण्यास सज्ज झाली आहे. ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटात अक्षय कुमार वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणार असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असल्याचे या चित्रपटाचा सहनिर्माता अश्विनी यार्दीने सांगितले. पुढील वर्षाच्या ३१मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अक्षयचा ‘सिंग इज ब्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता अक्षय कुमार आगामी 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
First published on: 28-04-2014 at 07:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singh is bling releasing 31st july