स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिंघम रिटर्न्सने दोन दिवसांतच ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ५३.१४ कोटींची कमाई केल्याने लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल असा चित्रपट जाणकारांचा अंदाज आहे . बॉलिवूडमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आतापर्यंत ‘खाना’वळ आघाडीवर होती. ‘खाना’वळीला मात देण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश २’ने केला होता. मात्र, यावर्षी अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्‍स’ने गर्जना करत सलमान खानला मात दिली होती. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न्‍स’ने पहिल्याच दिवशी ३२.०९ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘सिंघम रिटर्न्‍स’ने आघाडी घेतली आहे.
स्वातंत्र्यदिन असल्याने ‘सिंघम रिटर्न्‍स’ला पहिल्या दिवशी फटका बसेल, अशी अटकळ होती. मात्र, चित्रपटासाठी संपूर्ण देशभरात ८५ ते ९० टक्क्यांच्या आसपास अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळाल्याने निर्माते आश्वस्त होते.

Story img Loader