अभिनेता अजय देवगणचा सिंघम चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. अॅक्शन-कॉमेडी प्रकारतील या चित्रपटाला दिग्दर्शक रोहित शेट्टीचा टच लाभल्यामुळे २०११ साली या सिंघमने चांगलीच धमाल उडवून दिली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणासुद्धा करण्यात आली. मात्र, काही केल्या या चित्रपटाचे शिर्षक काय ठेवायचे याबद्दल निर्णय होत नव्हता. अखेर हा सिक्वेलपट ‘सिंघम रिटर्न्स’ या नावाने येणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. सिंघम रिटर्न्समध्ये अजय देवगणच्या जोडीला करीना कपूरची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ‘ओमकारा’ , ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल – ३’ आणि ‘सत्याग्रह’ या चित्रपटांतून अजय-करीनाची केमेस्ट्री पडद्यावर प्रेक्षकांना पाहिली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता ‘सिंघम रिटर्न्स’ची उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा