सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे सिंगिंग स्टार.या शोमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी झळकत असून त्यांच्या सुरांनी ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर आतापर्यंत अनेक दिग्गजांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली आहे. त्यातच आता सगळ्यांची लाडकी जोडी अजय-अतुल लवकरच या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजय -अतुल या जोडीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीला देखील आपल्या गाण्यावर थिरकायला लावलं आहे. त्यामुळे ही जोडी आता केवळ महाराष्ट्रापूरती मर्यादित न राहता तिची लोकप्रियता देशभरात पसरली आहे. त्यातच ही जोडी सिंगिंग स्टारच्या मंचावर येत असल्यामुळे स्पर्धकांसोबत प्रेक्षकांसाठीदेखील ही एक पर्वणी आहे.

‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून येत्या १८ तारखेला कार्यक्रमात अजय-अतुल विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक अजय-अतुल यांच्या गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर सादरीकरण करण्याबद्दल स्पर्धकांनामध्ये सुद्धा उत्साह आणि भीती असं संमिश्र वातावरण आहे. स्पर्धक आणि त्यांच्या मेंटॉरने मिळून अजय-अतुलसाठी खास गाणी बसवली आहेत. खूप दिवसांनी अजय-अतुल ही जोडी कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, हा विशेष भाग तीन तासांचा असून यात अजय-अतुल सोनी मराठी वाहिनीचं अभिमान गीत देखील गाणार आहेत. गुरु ठाकूरने हे गाणं बसवलं आहे तर अजय-अतुलने हे गाणं तालबद्ध केलं आहे. पहिल्यांदाच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अजय-अतुलच्या आवाजात लाईव्ह परफॉर्मन्स बघणं ही सगळ्यांसाठीच पर्वणी असणार आहे.