मोठ्या पडद्यावर भूमिका उत्तमरित्या साकारण्यासाठी बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील काही कलाकार अभिनयाबरोबरच इतर अनेक गोष्टींवर कमालीची मेहनत घेताना दिसतात. याच मेहनतीच्या जोरावर एक-एक पाऊल पुढे टाकत काही जणांनी हॉलिवूडपर्यंत मजल मारली. यातील अलिकडच्या काळात मोठ्याप्रमाणावर चर्चिले जाणारे नाव म्हणजे प्रियांका चोप्रा. इंग्रजी पॉप संगीत आणि क्वाँटिकोसारख्या मालिकेमुळे तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली. आता ती ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात ड्वेन जॉनसन या प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्यासोबत दिसणार आहे. चित्रपटात ती व्हिक्टोरिया लीडस नावाची खलनायिका साकारत असून, या भूमिकेसाठी ती खूप मेहनत घेत आहे. प्रसंगी तिला रात्रीच्या झोपेलादेखील मुकावे लागते. तशी पोस्टच तिने टि्वटरवर टाकली आहे. मूळ ‘बेवॉच’ टीव्ही मालिकेतील डेव्हिड हासेलहॉफ आणि पामेला अॅंडरसनदेखील चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारणार आहेत. पुढील वर्षी १९ मेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
‘बेवॉच’च्या चित्रीकरणामुळे प्रियांकाला झोप मिळणे झाले कठीण
'बेवॉच'मध्ये तीड्वेन जॉनसन या प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्यासोबत दिसेल.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2016 at 18:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sleepless nights for priyanka chopra during baywatch shoot