ज्येष्ठ अभिनेते आणि संवाद लेखक कादर खान यांचे कॅनडामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक भावुक पोस्ट ट्विट केली आहे. ट्विटमध्ये स्मृती इराणी म्हणतात, ” जर तुम्ही ८०-९० च्या दशकात कादर खान यांचे चित्रपट पाहिले असतील तर तुम्हाला त्यांची जादू काय होती ते ठाऊक असेलच. मी कादर खान यांना प्रत्यक्षात कधीही भेटू शकले नाही. भेटले असते तर त्यांना थँक्स म्हटलं असतं आम्हाला हसवण्यासाठी” त्यांना मी भेटले असते तर थँक्स नक्कीच म्हटले असते असे स्मृती इराणी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मी त्यांना भेटू शकले नाही याची खंत कायम माझ्या मनात राहील. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कादर खान यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि हिंदी सिनेसृष्टीसह सगळ्यांनाच वाइट वाटले. २०१७ मध्ये कादर खान यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्तच ढासळली. मागील काही दिवसांपासून त्यांना कॅनडा या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे ४३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० सिनेमांमध्ये अभिनय केला तर २५० सिनेमांसाठी त्यांनी संवाद लेखन केले आता असा हा माणूस आपल्यातून निघून गेला आहे.

Story img Loader