नवनियुक्त केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या लवकरचं ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या शूटींगला परतणार आहेत. उमेश शुक्लाच्या या चित्रपटाचे हिमाचल प्रदेश येथील माशोब्रा येथे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक उमेश शुक्ला म्हणाला की, स्मृती यांनी यापूर्वीच ऋषी कपूर आणि अभिषेकसोबत काही दृश्यांचे शूटींग केले आहे. आता आम्ही अभिषेक आणि असिन यांवर गाणे चित्रीत करत आहोत. त्यानंतर उर्वरित शूटींगच्या कामात स्मृती इराणी आमच्यासोबत असतील. जेव्हा स्मृती निवडणूक लढत होत्या तेव्हाही त्या नेहमीच सहकार्य करत होत्या. त्यांनी कधीच त्यांच्या कामामुळे शूटींगमध्ये खंड पडू दिला नाही. आता जेव्हा त्या मंत्री झाल्या आहेत तेव्हाही त्यांनी तारखांमध्ये कोणतेही बदल करून घेतलेले नाहीत. ठरलेल्या दिवशी त्या शूटींगला उपस्थित राहतील.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2014 रोजी प्रकाशित
स्मृती इराणी ‘ऑल इज वेल’च्या शूटींगला करणार सुरुवात
नवनियुक्त केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या लवकरचं 'ऑल इज वेल' या चित्रपटाच्या शूटींगला परतणार आहेत.
First published on: 10-06-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani resumes shooting for all is well